औरंगाबाद – औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून देखील खून होणे, हल्ला करणे या गोष्टी सऱ्हासपणे घडत आहेत. अशातच काल सिडको परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली.
पाणीपुरी साठी पैसे न दिल्याने चौघांनी एका तरुणाला शिवीगाळ करून चक्क चाकूने हातावर आणि मांडीवर वार केले. ही घटना सिडको परिसरातील छत्रपती महाविद्यालयाजवळ घडली. क्षितिज कांबळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या विरोधात क्षितिज कांबळे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे