प्रेमविवाहानंतर घरच्यांच्या भितीने मुलाला जन्म देऊन ‘ती’ हॉस्पिटलमधून पळाली; पोलिसांनी 8 महिण्यांनी ‘असं’ काढलं शोधून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्यानंतर काही काळ सोबत राहून नंतर पुन्हा घरच्या भीतीने सोबत तरुणी राहत होती मात्र दोघाचे भेटणे सुरू होते. त्यातच तरुणी गर्भवती राहिली आणि तिने थेट क्लासेस लावण्याचा बहाणा करून औरंगाबाद गाठले. ३० ऑगस्ट २०२१ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती घाटीत एकटीच आली. बोगस नाव नोंदवून एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने लगेच घाटीतून धूम ठोकली. मात्र, आठ महिन्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी तांत्रिक तपास करत तिचा शोध घेऊन अखेर तिच्या कुटुंबीयांची देखील समजूत घालून मुलाला तिच्या स्वाधीन केले. बेगमपुरा पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

३० ऑगस्ट २०२१ रोजी घाटीत प्रसुती विभाग येथे महिला एका दिवशाच्या नवजात मुलाला प्रसुतीगृहातच सोडुन पळुन गेली होती. त्यावरुन बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल बोडखे करत होते. महिलेने घाटीत चुकीचे नाव नोंदवल्याने तिचा शोध घेण्याचा मोठा प्रश्न पोलीसांसमोर उभा राहीला होता. मात्र, घाटीमधील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. प्रसुत्ती विभागातील सर्व स्टॉफ व दाखल असलेले इतर रुग्ण यांना विचारपुस करुन अतोनात प्रयत्न करुन सुध्दा महिलेबाबत माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे अखेर बालकाच्या संगोपणासाठी त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्याचे नाव ” किरण “असे साकार शिशुगृह येथे संगोपणासाठी ठेवण्यात आले. दरम्यान, ‘तीची’ माहिती पोलिसांना मिळलीच. त्यावरुन तिला व तिच्या परीवाराला पोलिसांनी संपर्क केला. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. परंतु त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली तेव्हा तिने कबुली दिली.

तिने कबुली दिली कि, तिचे एका मुला सोबत प्रेम संबंध होते. घरी न सांगता दोघांनी प्रेम विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर घरच्या भितीने सोबत राहिले नाही.  परंतु, यादरम्यान ‘ती’ गर्भवती राहिल्याने तिने घाबरुन घरी न सांगता औरंगाबाद येथे क्लासेस लावण्याचा बहाना करुन एक किरायाची रुम केली. पुढे तिला प्रसुती कळा येवु लागल्याने ती ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी एकटीच घाटीत दाखल झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, समाज व कुटुंब आपल्याला बाळासह स्विकारेल की नाही या भिती पोटी तिने बाळाला प्रसुतीगृहातच सोडुन पलायन केले होते.

पोलिसांकडून कुटुंबियांचे मनपरिवर्तन

तिने कबुली दिल्यांनतर उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी तिची व तिच्या कुटुंबियांचे मनपरिवर्तन करून त्यांनी बाळाचा स्विकार करण्याचे ठरविले. तपासी अधिकारी यांनी बाळ व आई यांची डी.एन.ए तपासणी केली. आई व  बाळाचा डी.एन.ए अहवाल मिळता जुळता आल्याने त्यानंतर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर बंसवाल, सदस्य प्रा. आश्विनी लखमले, अँड. अनिता शिऊरकर यांचे आदेश घेवुन(किरण) यास साकार शिशु गृह औरंगाबाद येथुन ताब्यात घेवुन बाळाची आई व त्यांचे कुटुंबियांच्या सुखरुप ताब्यात दिले. हि कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल बोडखे, ज्योती गात, हैदर शेख,  प्रविण केणी, रियाज मोमीन, शरद नजन, श्रीकांत सपकाळ यांनी केली आहे.

Leave a Comment