कोरोनाच्या भीतीने इंग्लड मधील तरुणांनी सोडले धूम्रपान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोना मुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच दररोज च्या येणाऱ्या बातम्या मुळे लोक अजून नर्वस झाले आहेत. अश्यातच इंग्लडमध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे. कोरोनाच्या काळात तेथील ध्रुमपान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना हा जे लोक जास्त प्रमाणात ध्रुमपान करतात याना लवकर होतो असा दावा इंग्लड आणि अमेरिकेतील काही संस्थांनी अभ्यासांतर्गत केला आहे.

महामारीच्या काळात विशेषतः युरोपियन देशांमध्ये कोरोनामुळे अनेक बळी जात आहेत त्यामध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तरुणांना या आजाराचा धोका कमी आहे.असा निष्कर्ष काढला गेला होता. पंरतु नंतर आलेल्या आकडेवारीनुसार तरुणांना लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्ये अनेक तरुण दगावले गेले आहेत. तरुणाच्या मृत्यूची संख्या हि मृत वृद्ध लोकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याच काळात इंग्लड च्या सरकारने तरुणानं ध्रुमपान न करण्याचा सल्ला दिला. जे लोक ध्रुमपान करताहेत त्यांना कोरोना होण्याचा किंवा संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. हेच काहीसे प्रमाण आशिया खंडातील काही भागांमध्ये आहे. याचा परिणाम म्हणून आणि वाढती बळींची संख्या समोर आल्यानंतर जवळपास १ मिलियन तरुणांनी ध्रुमपान सोडल्याची माहिती इंग्लड सरकारने दिली आहे. मुख्य म्हणजे ध्रुमपान सोडणारे जास्त लोक हे २० ते २५ वयोगातील आहे. त्यामध्ये वृद्धांचे प्रमाण कमी आहे.

सॅन फ्रान्सिस्को आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया याच्या सर्वे नुसार ज्यांना व्यसन आहे मग ते ध्रुमपान असो तंबाखू असो किंवा दारू असो त्यातील तिघांपैकी एकाला कोरोनाची लागण होणारच . त्यांनी १८ ते २५ वयोगातील मुलांचा अभ्यास केला. ‘ ऍक्शन ऑन स्मोकिंग अँड हेल्थ’ हि संस्था आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ यांनी एक सर्वेक्षण केलं. त्यामध्ये जे लोक ध्रुमपान करतात ते हाय रिस्क या गटात मोडतात. या सर्वेक्षणानुसार अनेकांनी आपल्याला धोका उध्दभवू नये म्हणून स्मोकिंग सोडलं आहे. ध्रुमपान हि ब्रिटन मधील सर्वात मोठी समस्या आहे. कोरोना महामारीच्या पार्श्ववभूमी वर अनेक देशांनी लॉक डाउन केला होता. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिसला ने केलेल्या नोंदणीनुसार आणि कोरोनाच्या ट्रॅक नुसार लॉक डाउन च्या काळात अनेक तरुणांनी ध्रुमपान करण्यास सुरुवात केली होती. आणि त्याचे प्रमाण २. २ मिलियन इतके मोठ्या प्रमाणात होते. एकाकी जीवन सुरु झाल्याने , त्यामध्ये वाढ झाली. अनेकांना ध्रुमपान चुकीचं आहे असं वाटत असूनही ध्रुमपान सोडू शकत नव्हते. त्यानंतर सरकारच्या निर्णयामुळे अनेकांमध्ये सकारात्मक बदल होत ध्रुमपान सोडले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment