BREAKING : येवतेश्वर घाटात युवतीची उडी घेवून आत्महत्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

येवतेश्वर घाटात एका युवतीची उडी मारुन आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. खटाव तालुक्यातील दरूज येथील युवतींने आत्महत्या केल्याचे समजत असून अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील दरूज येथील शितल नितीन पाटोळे असे येवतेश्वर घाटात आत्महात्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सध्या ही युवती सातारा शहरातील संभाजीनगर येथे राहत होती. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युवतीने आत्महत्या केल्याचे समजताच घटनास्थळी पोलिस दाखल झालेले आहेत. तसेच घाटातून मलींचा मृतदेह काढण्यासाठी शिवेंद्रराजे रेस्पी टिम घटनास्थळी दाखल झाली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like