वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे.

याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर शितल रोहित तरटे (वय 21) वर्षे गंभीर जखमी असलेल्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी दुपारी चार वाजेनंतर आकाश ढगांनी व्यापले. काही वेळातच वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला. फुलंब्री परिसरासह हरसुलपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले. नांगरट झालेल्या शेतीही वाहू लागल्या.

दरम्यान, बाभुळगाव तरटे शिवारातील मका पेरणीची कामे सुरू होते. समृद्धी तरटे व शितल तरटे या मका पेरीत असताना पाऊस सुरू झाल्याने त्या आडोशाला बसल्या. याच वेळी वीज कोसळली यात समृद्धी तरटे तिचा जागीच मृत्यू झाला. तर, शितल तरटेही गंभीर जखमी झाली आहे. समृद्धीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तसेच भगवान कडुबा तरटे यांची एक गाय व बैल ही या घटनेत मयत झाली. लहुगड नांद्रा येथेही वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती तलाठी रवींद्र मुखेडे यांनी दिली आहे.

Leave a Comment