लग्नाचे आमिष दाखवून जवानाचे तरुणीसोबत ‘हे’ कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावामधील तरुणीवर लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने आरोपी जवाना विरोधात उमदी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
जत तालुक्यातील पीडित तरुणी आपले महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेली होती. या पीडित तरुणीचे आई-वडील हे ऊसतोडणी मजूर आहेत. आरोपी जवानाची आणि पीडित तरुणीची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर या दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

यानंतर आरोपी जवान सुट्टीवर आल्यानंतर त्याने पीडित तरुणीस स्वतःच्या बुलेटवरून सांगली या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी विश्रामबाग येथील लॉजवर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जत येथील लॉजवर नेऊन पुन्हा बलात्कार केला. यानंतर पीडित तरुणीने आरोपी जवानाच्या मागे वर्षांपासून लग्नाचा तगादा लावला होता. मात्र आरोपी तिला टोलवाटोलवीची उत्तरे देत होता. यानंतर या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने उमदी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment