कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना विरोधात लढाईत अनेकजण जिवावर उधार होऊन लढत आहेत. सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे रुग्णालये कोव्हीड केअर सेंटरमध्ये बेड शिल्लक नाहीत अशा परिस्थितीमध्ये घरीच उपाचार घेत असणार्या व इतर आजारी रुग्णांसाठी व्हॅंटीलेटर ऑक्सीजनची गरज निर्माण झालेस रुग्णालयात जागा नसलेने ऑक्सीजन अभावी मृत्यूचेप्रमाण कराड तालुक्यात वाढले आहे. रुग्णालयात जागा मिळत नसलेल्यांने रुग्णांच्या नातेवाईकांची अवस्था सैराभर होत असुन अशा बिकट परिस्थितीत कराड मलकापुर येथील सुरज शेवाळे हा युवक कराडच्या कृष्णा उद्योग समुहाच्या दोन ऑक्सीजन काॅंन्संट्रेटर मशीनद्वारे पुढील वैद्यकिय मदत मिळेपर्यंत दिवसरात्र जीवदान देण्याचे काम करत आहे.
सुरज शेवाळे हे काम तत्परतेने व धाडसाने करत असुन तालुक्यात कोठेही अन् कधीही ऑक्सीजनची गरज आहे अशी माहिती मिळताच विनाविलंब मशिन घेऊन रुग्णांच्या घरी मदतीसाठी धावतो. रुग्णांच्या घरी पोहचुन स्वता ऑक्सीजन सुरु करतात उपचारांचे सर्व मार्ग बंद झाल्या नंतर सुरजकडुन होणारी अनमोल मदत पाहुन रूग्णाचे कुटूंबिये अक्षरशः हात जोडतात. ऑक्सीजन काॅंन्संट्रेटर मशीनद्वारे दोन आठवड्यात आठ दहा रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हॉंटिलेटर, पुढील वैद्यकिय मदत मिळेपर्यंत सुरज यांनी जीवदान दिले आहे. सुरज शेवाळे यांच्या कोरोनाविरोधातील कामाचा झपाटा पाहुन कृष्णा उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ सुरेश भोसले व डॉ अतुल भोसले यांनी सुरजला आणखी ऑक्सीजन काॅंन्संट्रेटर मशीन देण्याचे ठरवले आहे.
सुरज शेवाळे हे राजकीय पदाधिकारी असले तरी त्यांनी राजकारण विरहित फक्त रूग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानून सुरु असलेली धडपड कौतूकास्पद असुन राजकारणाला तिलांजली देत माणुसकी म्हणून धावलेल्या सुरज यांच्या कामाची चर्चा कराड मलकापूर मध्ये सुरु आहे. सुरज शेवाळे यांच्यासारखे कार्य प्रत्येकाने सुरू केले तर कोरोना महामारीत माणसांबरोबर माणुसकीही नक्की जगेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’