धक्कादायक ! ‘या’ क्षुल्लक कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या आहारी गेलेल्या लहान भावाने वडिलांकडे पैसे मागितले हे पाहून मोठ्या भावाने त्याला हटकले. याचा लहान भावाला राग आला म्हणून त्याने रागाच्या भरात मोठ्या भावाची हत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील घाटी बेघर परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

दीपक ज्योतिराम गेडाम असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर दिलीप गेडाम असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. लहान भाऊ दिलीप गेडाम याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो दारूसाठी नेहमी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. एवढेच नाहीतर आईवडिलांनी पैसे दिले नाहीतर त्यांना त्रास देत होता. घटनेच्या दिवशीसुद्धा आरोपी दिलीपने आईकडे पैसे मागितले. पण आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पैशासाठी दिलीपने आपल्या आईलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी मोठा भाऊ दीपक गेडाम याने लहान भावाला समाजवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना त्रास का देत आहेस असे म्हणून त्याने लहान भावाला हटकले. यानंतर या दोघां भावांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात लहान भाऊ दिलीपने मोठ्या भावावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे दीपक जागेवर कोसळला. यानंतर दिपकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलीपला अटक केली. घाटंजी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

You might also like