पुण्यात सिनेस्टाइल थरार ; अॅसिड हल्ला करुन युवकाने स्वतःवर केला गोळीबार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । नवी पेठेतील विठ्ठल मंदिराच्या जवळ असलेल्या एका इमारतीजवळ मैत्रिणी सोबत गप्पा मारत असलेल्या युवकावर एका अज्ञाताने अॅसिड फेकल्याची घटना घडली. यावेळी आरोपी युवकाने त्याच्या पिस्तुलातून गोळीबार केलाची माहिती ही प्रत्यक्षदर्शीनी दिली.

सदर युवक अॅसिड हल्ला केल्यानंतर तेथून जवळील इमारतीमध्ये लपून बसला. त्यानंतर काही वेळात पोलिस घटनास्थळी आल्याने त्यांनी आरोपीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. हे नाट्य थरार सुमारे दोन तास चालू होते. आरोपी युवक हा इमारतीच्या गच्ची वर असलेल्या डक्ट मध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करत असतांना तो त्या डक्ट मध्येच कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला.

प्राथमिक माहिती नुसार त्याने स्वतःवर गोळी सुद्धा झाडली आहे असे समजत आहे. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने आरोपीला इमारती मधून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Comment