पुणे प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला देशभरात नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज पाच तारखेला देशातील नागरिकांना घरातील लाईट बंद करुन हातात दिवे घेऊन घरांबाहेर जमण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर आज अनेकांनी घरातील लाईट बंद करुन गो कोरोना गो च्या घोषणा दिल्या. मात्र देशातील काही तरुणांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिआव्हान दिले आहे. या तरुणांनी मोदी यांना ९ वाजता ९ प्रश्न विचारले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनानंतर त्यावर अनेक वादप्रतिवाद झाले. काहींनी मोदींकडून पंतप्रधान म्हणुन जास्त अपेक्षा असून त्यांनी दिवे लावा, घंटा वाजवा असली आवाहने करण्याएवजी कोरोनाशी लढण्याकरता आवश्यक असणार्या गोष्टी कृतीत उतरवणे गरजेचे आहे. तसेच देशातील नागरिकांना अशा वेळी योग्य माहिती आणि विश्वास देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यापार्श्वभुमीवर #९बजे९सवाल अशा हॅशटेग वापरुन काही तरुणांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आहेत.
#9बजे9सवाल #9Baje9Sawaal #9Baje9Minutes #HumLightNahiBujhaenge #9बजे9मिनिट pic.twitter.com/Y9z21JFxFI
— Akshay (@AkshayIA) April 5, 2020
भारतात ११ हजार नागरिकांमागे एकच डाॅक्टर कसा लढणार असा प्रश्न करत काहींनी आत्तापर्यंत आरोग्यावर का खर्च नाही केला? असा प्रश्न विचारला आहे. तर काहिंनी वर्क आणि होम या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे नाहीत अशा गरिबांसाठी तुमच्या वर्क फ्रोम होम च्या काळात काय योजना आहेत? असा सवाल केला आहे. तसेच एम्स च्या डाॅक्टरांना अद्याप सुरक्षा किट का नाही मिळालेले? असा प्रश्नही यावेळी काहींनी विचारला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींकडून कोरोना संकटाच्या प्रसंगी सामान्य नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तेरे देणे अपेक्षित आहे. इतर मोठमोठ्या देशातील नेते कोरोनाच्या काळातही पत्रकार परिषद घेऊन माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प देखिल २ तास पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या प्रश्नांना सामोरे जात आजेत. मात्र पंतप्रधान मोदी व्हिडिओ मेसेज ट्विट करुन जनतेशी संवाद साधत आहेत. तेव्हा मोदी देशातील या तरुणांचे प्रश्न गांभिर्याने घेणार का असा प्रश्न आहे.