पंजाबमध्ये आपची जादू चली : काॅंग्रेस आणि आप पुढे- मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हँलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर आम आदमी पार्टी सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. पंजाबात सत्ता कोणीही मिळविली तरी अरविंद केजरीवाल यांच्या आपची जादू चालेली असेच म्हणावे लागेल.

पंजाबमध्ये काॅंग्रेसची एकहाती सत्ता असणारे राज्य होते. मात्र, आम आदमी पार्टीच्या एंन्ट्रीमुळे काॅंग्रेसची चांगलीच गोची दिसत आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या117 जागेचे कल पुढीलप्रमाणे आप- 60, काॅंग्रेस- 39, अकाली-15 तर भाजप 3 जागेवर होते. त्यामुळे आप आणि काॅंग्रेस यामध्ये सत्ता कोण मिळवणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पंजाबमध्ये सर्वात चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार नवज्योत सिंधू यांचा पराभवाकडे वाटचाल असल्याची दिसून येत आहे, ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर काॅंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवारही पिछाडीवर होते. तर आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आघाडीवर असून विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.

Leave a Comment