हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : WhatsApp या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफार्मचे जगभरात लाखो यूजर्स आहेत. आपल्या यूजर्सना व्हाट्सअप वापरत असताना नवनवीन गोष्टी मिळाव्या यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील असते आणि नवनवीन फीचर्स लाँच करत असते. परंतु व्हाट्सअपचे असे काही नियम आणि अटी असतात ज्याचे पालन करने यूजर्सचे कर्तव्य असते. मात्र अनेकदा कळत नकळत यूजर्स कडून WhatsApp च्या धोरणाचे उल्लंघन होते, त्यानंतर त्यांचे खाते बॅन केले जाते. त्यामुळे तुम्हाला व्हाट्सअप अकाउंट वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यतः तुमचं खाते ब्लॉक होऊ शकते.
व्हॉट्सॲप वापरताना या 5 चुका करू नका-
तुम्ही WhatsApp चालवण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरत असाल तर WhatsApp तुमच्यावर कारवाई करू शकते. तुम्ही जर जीबी व्हाट्सअप, व्हॉट्सॲप प्लस आणि व्हॉट्सॲप डेल्टा यांसारखे ॲप वापरत असाल तर व्हाटसप तुमचं अँप बॅन करू शकते.
तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीच्या डिटेल्स वरून व्हाट्सअप सुरु केलं असेल तरीही कंपनीला ते लगेच समजते आणि तुमचा व्हाट्सअप नंबर बॅन होऊ शकतो.
जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते. एखादा नंबर जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि तुम्ही त्यावर सतत मेसेज करत राहिला तर व्हाट्सअपच्या नियमांचे उल्लंघन तुम्ही करत आहात असं समजलं जाते आणि कंपनी तातडीने ऍक्शन घेत तुमचा व्हाट्सअप नंबर बॅन करू शकते
जर अनेक लोकांनी तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट रिपोर्ट केले किंवा तुम्हाला ब्लॉक केले असेल व्हॉट्सॲप अशा अकाउंटला बनावट आणि स्पॅम मेसेज करणारे अकाउंट समजून ब्लॉक करू शकते.
तुम्ही तुमच्या व्हाट्सअप अकाउंट वरून अश्लील सामग्री किंवा धमकीचे संदेश पाठवत असाल तरी सुद्धा व्हाट्सअप कडून तातडीने तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते