हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे येत्या ५ ऑगस्ट रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत.त्यानिमित्ताने जिल्हाभर या दौऱ्याच्या नियोजन बैठकांचा सपाटा लागल्याचे चित्र आहे.धुळ्यातल्या साक्रीत जिल्हा विस्तारक मा.अमित पाटील आणि धुळे जिल्हा युवा सेना अध्यक्ष ॲड.पंकज गोरे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीला शिवसेना साक्री तालुका प्रमुख पंकज मराठे,तालुका संघटक अमोल सोनवणे,युवतीसेना जिल्हा समन्वयक प्रियंका जोशी,युवा सेना तालुका प्रमुख बाळासाहेब उर्फ चेतन देवरे,महेश खैरनार,रमेश शिंदे,युवतीसेना तालुका प्रमुख कामिनी देसले, युवासेनेचे नवनियुक्त पदाधिकारी व तालुक्यातील युवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीविषयी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना बाळासाहेब देवरे म्हणाले की “जिल्ह्यात शिवसेनेला आणि युवासेनेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता.वरुणजी सरदेसाई यांच्या दौऱ्याचे नियोजन करणे भागचं होते.सुरवातीला आम्ही फक्त ८ – १० लोकचं युवासेनेचे काम करत होतो.आज त्या रोपट्याचा महावृक्ष झाला आहे.हे सगळं वरिष्ठांच मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे शक्य झालयं.वरूणजी देसाई यांच्या दौऱ्याने आम्हाला काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल असा माझा विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब देवरे यांनी केले तर सूत्रसंचालन कामिनी देसले यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक बाळासाहेब देवरे,महेश खैरनार आणि रमेश शिंदे हे मान्यवर होते.