व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तलवारीने केक कापणे आले अंगलट ! वाढदिवसाची भेट म्हणून तरुणाला मिळाले ‘हे’ गिफ्ट

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका तरुणाला आपल्या वाढदिवसाचे चांगलेच गिफ्ट मिळाले आहे. त्याला आपल्या वाढदिवसादिवशीच तुरुंगाची हवा खावी लागली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या बर्थडे बॉयने आपल्या वाढदिवसानिमित्त दोन मित्रांना गोळा करून त्याने भर रस्त्यात तलवारीने केक कापला. तलवारीनं केक कापण्याचा हा प्रकार त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या सिलम बर्षम सुब्रह्मण्यम या 22 वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्रासोबत आपल्या बर्थडेचा केक कापण्याचे ठरवले. यानंतर त्याने कांदिवलीतील रघुलीला मॉलसमोरच्या फुटपाथवरच अगदी थाटात तलवारीने केक कापला. यावेळी एक मित्र त्याच्या शेजारी उभा होता, तर दुसऱ्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तरुण तलवारीने केक कापताना दिसतो, तर त्याच्या शेजारी उभा असलेला आणि रेकॉर्डिंग करणारा मित्र त्याच्या वाढदिवसा निमित्त गाणे गाताना दिसत आहे. यावेळी सिलमने त्याच्यासमोर ठेवलेले तीन केक एकामागून एक कापले आणि वाढदिवस उत्साहात साजरा केला.

पोलिसांनी केली अटक
स्वतःजवळ तलवार बाळगणे आणि रस्त्यावर ती परजणे हा एक प्रकारे गुन्हा आहे. त्यातच या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यामुळे कापल्यामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी सिलम आणि त्याचा मित्र कौसर खान यांना अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.