धक्कादायक ! मध्यरात्री शेजारील महिलेच्या घरात घुसला युवक; रक्तबंबाळ होऊन माघारी परतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. यामध्ये झांघा भागातील दुबौली गावात रविवारी रात्री एक वाजायच्या सुमारास महिलेने शेजारच्या युवकावर चाकूने हल्ला केला. ह्या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ तरुण गोंगाट करीत गच्चीवर पोहोचला.आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आणि सोमवारी तिला न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने तिला तुरूंगात पाठवले. तर या प्रकरणात जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेजारच्या युवकाने बलात्काराच्या इराद्याने घरात प्रवेश केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

झांझाच्या दुबौली गावात राहणाऱ्या रंचना नावाची महिला उमालाल चौहान याच्या शेजारी राहते. या दोघांमध्ये चांगले संबंध होते. यानंतर काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपी महिलेचा नवरा नरेंद्र बाहेरगावी राहतो. यामुळे ती घरी एकटी राहते आणि स्वत: च्या बचावासाठी दररोज उशीच्या खाली चाकू घेऊन झोपते. रविवार रात्री एकच्या सुमारास शेजारी राहणारे उमालाल हे गच्चीवरून त्यांच्या घरात घुसले. त्याच्या आवाजाने रंजना जागी झाली आणि त्याच्यावर चाकूने वार केले. हे वार झाल्यानंतर रक्तबंबाळ उमालाल ओरडला आणि गच्चीवर जाऊन आरडाओरडा करू लागला.

उमालालच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. यानंतर त्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या हल्ल्यानंतर रचना घरातून पळून गेली. यानंतर पोलिसांनी तिला शोधून अटक केली आहे. उमालाल यांच्या पुतण्या प्रशांत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी महिलेने उमालाल तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने घरात घुसला होता असे सांगितले आहे. घटनेमागील खरे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी या महिलेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. उमालाल हे कंत्राटी वीज कर्मचारी आहे. तसेच त्यांना ३ मुले आहेत. घटनेच्या वेळी पत्नी आणि मुले घरात झोपले होते.

You might also like