औरंगाबाद : सन 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात महागाई च्या मुद्द्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, त्यावेळी पेट्रोल चे भाव 56 रु व गॅस 450 हृया भाववाढी विरोधात त्यांनी हे आंदोलन केले होते.
आज मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या काळात पेट्रोल गॅस अन्नधान्य खाद्य तेल हे दुप्पट झाले असून त्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेते एक शब्द बोलत नाहीत, यामुळे भाजप सरकार चा निषेध म्हणून सदरील आंदोलन करण्यात आले व स्मृती इराणी यांना “चोळी बांगडी” चा आहेर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉवेल टोपी चा आहेर करण्यात आला.
स्मृती इराणी यांच्या नवी दिल्ली येथील निवास स्थान च्या पत्त्यावर सदरील रिटर्न गिफ्ट त्यांना पाठविण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश चे प्रवक्ते डॉ निलेश अंबेवाडीकर, गुरमित सिंग गिल,विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आदी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा