युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष : निवडणूकीत कुणाल राऊत, शिवराज मोरे शर्यतीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. वरिष्ठाच्याकडून मुलाखत झाल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष यांची निवड जाहीर होणार आहे.

निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर एकची मते मिळाली आहेत. कराड येथील शिवराज मोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे 3 लाख 80 हजार 367 तर तिसऱ्या क्रमांकावर शरण बसवराज पाटील यांना 2 लाख 46 हजार 695 मते मिळाली. आता या तिन्ही उमेदवारात कोण बाजी मारणार हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली होती.

Leave a Comment