सेल्फी काढायला गेला आणि पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एका तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्देवी अंत झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली आहे. या मृत तरुणाचे नाव अनिल सरोकार असे आहे. या तरुणाचा मृतदेह तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात सापडला आहे. या घटनेमुळे खांडवी गावात शोकाकूळ वातावरण आहे. घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला आहे.

अनिल सरोकार हा तरुण शनिवारी दुपारी सेल्फी काढण्यासाठी वान नदीपात्रात उतरला होता. या दरम्यान सेल्फी काढत असताना त्याचा अचानक पाय घसरून तोल गेला आणि तो नदीपात्रात पडून वाहून गेला. त्यावेळी घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने युवाकाला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही.

हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराच्या पाण्यात हा युवक वाहून गेला. युवकाच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांकडून नदीपात्रात शोधकार्याला सुरुवात केली. यादरम्यान तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

Leave a Comment