सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत देशमुखनगर येथे वाहन चेकींग करीत असताना एक ट्रिपल शीट मोटार सायकल आलेने त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला होता. परंतु तो न थांबता तसाच पुढे गेल्याने पोलीसांचा संशय बळावला म्हणून त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. पोलीसांनी चौकशी केली असता तु कोण आम्हास विचारणारा असे म्हणुन आरोपीने फिर्यादीशी हुज्जत घातली होती. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विकास दत्तात्रय जाधव (वय- 28 वर्ष रा.निसराळे ता. जि. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास बोरगाव पोलिस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक एस. आर. वाघ यांचे मार्गदर्शनाखाली म. पो. उप निरीक्षक बोरगाव पोलीस ठाण्याचे श्रीमती व्हि. एस. डाळींबकर, यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरचा खटला मा. न्या. आर. के. राजेभोसले यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अॅड. महेश उमाकांत शिंदे यांनी खटल्याचे कामकाज पाहीले. नमुद केसमध्ये एकुण 6 साक्षीदार तपासणेत आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून 6 महीने सक्त मजुरी व 500/- रु. दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
श्रीमती सुनिता श्रीरंग देखणे बोरगाव पोलीस ठाणे यांनी केस कामी परिश्रम घेतले. या कामी पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. सातारा किशोर धुमाळ, पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पो. हवा. शमशुदिन शेख, पो. हवा. गजानन फरांदे, म. पो. ना. रेहाना शेख, पो. कॉ. राजेंद्र कुंभार, म. पो. कॉ. अश्विनी घोरपडे, पो. कॉ. अमित भरते यांनी योग्य ती मदत केली आहे.