Sunday, June 4, 2023

मित्राच्या Whatsapp ला बहिणीचा फोटो पाहून संतापलेल्या भावाने उचलले ‘हे’ पाऊल

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मित्राने आपल्या जिवाभावाच्या मित्राचा खून केला आहे. आपल्या मित्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला बहिणीचा फोटो पाहून संतापलेल्या भावाने आपल्या जिवाभावाच्या मित्रावर वार केले. या दोघां मित्रांमध्ये बहिणीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यावरून वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर मित्रानेच मित्राचा काटा काढण्याचा कट रचला.

काय आहे नेमके प्रकरण ?
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मृत रोहित कंजानी नावाच्या तरुणाने स्वतःच्या व्हॉट्अप स्टेटसला त्याचा मित्र विजय रुपाणी याच्या बहिणीचा फोटो लावला होता. हे पाहून विजयला राग आला त्याने ताबडतोब आपल्या बहिणीचा फोटो स्टेटसवरून काढून टाकावा असे रोहितया सांगितले. मात्र आपण जिचा फोटो लावला आहे, तिचा काही आक्षेप नसताना तू का आक्षेप घेत आहेस असे रोहित म्हणाला. या कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर विजयने रोहितचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

कशाप्रकारे काढला काटा ?
विजयने पंकज कुकरेजा नावाच्या एका तरुणाला सोबत घेऊन रोहितवर हल्ला करण्याचा कट रचला. विजय आणि पंकज सोबत एक चाकू घेऊन रोहितला भेटायला गेले आणि त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये रोहित गंभीर झाला.यानंतर रोहितला रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रोहितची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. या हल्ल्यानंतर विजय आणि त्याचा मित्र पंकज फरार झाले आहेत.

पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी विजय आणि पंकजविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. यानंतर पोलिसांना आपल्या खबऱ्यांकडून ते दोघं एका चौकात येणार असल्याची टीप मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी आपला सापळा रचून दोघांना अटक केली.