Breaking | बेवफा सनम अलविदा म्हणत तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

पत्नीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी मारल्याच्या रागातून, परभणी शहरातील गौतम वाव्हळे या 28 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि 23 एप्रिल रोजी भारतनगर परभणी येथे सकाळी अघडकीस आलीय . मृत्युपूर्वी या तरुणाने ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये, पत्नीला उद्देशुन …सनम बेवफा अलविदा , …आत्महत्या करत असल्याची माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू असल्याने गौतम ची पत्नी माहेरी राहत होती. तिला भेटायला गौतम हा तिच्या माहेरी गेला होता. त्यावेळी त्याचे आणि पत्नीचे भांडण झाले. सोबत गौतम आणि पत्नीच्या घरातील इतर लोकांसोबत ही त्याची बाचाबाची झाली. त्यामुळे घरातील लोकांनी पोलिसांकडे गौतम यांची फोन करून तक्रार नोंदवली आणि पोलिसांनीही कोणतीही तक्रार दाखल नसताना गौतम याला मारहाण केली. त्या रागातून गौतम यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

मागील काही दिवसांपासून गौतम ची पत्नी माहेरी राहत होती. तिला नांदण्यासाठी गौतम वारंवार तिच्या घरी जात असल्याचे त्याने ऑडिओ क्लिप मध्ये सांगितला आहे. मयत गौतम च्या भावाने याप्रकरणी 302 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय .

Leave a Comment