फाटलेले कपडे घालून पोहचला कोर्टात आणि ते पाहून न्यायाधीशांनी दिला असा निर्णय

नालंदा | जगात भावनांना एक वेगळेच महत्त्व असते. एक व्यक्ती भावनेच्या आधारावर खूप मोठे मोठे निर्णय घेऊ शकतो. असाच एक निर्णय नालंदाच्या जिल्हा किशोर न्याय परिषदेचे मुख्य न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा यांनी एका प्रकरणामध्ये दिला आहे. कष्टाने शिक्षण घेणाऱ्या एका मुलाच्या विरोधातील FIR रद्द करून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी ठरवून दिल्याबद्दल संपूर्ण देशातून आनंद व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2020 मध्ये दोन कुटुंबामध्ये भांडणं झाली होती आणि आरोपी ते भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी भांडणामध्ये त्यालाही मारहाण झाली. कपडे फाटले. जखमही झाली. पण समोरील पार्टीने 29 फेब्रुवारी 2020 मध्ये जी FIR दाखल केली त्यामध्ये आरोपीचे नाव होते. त्यामुळे त्याला अटक झाली होती. केसच्या सूनवायीच्या वेळी आरोपी फाटलेले कपडे घालून आला होता त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला कारण विचारले. त्यावर त्याने पूर्ण कहाणी सांगितली.

गरिबीमुळे शिक्षणात अडथळे येत आहेत. त्यामुळे तो रस्त्यावर अंडे विकून शिकतो. लोकडाऊनमध्ये प्रचंड नुकसान झाले असून ऑनलाईन शिक्षणातही खंड पडला आहे. अशी कहाणी आरोपीने सांगितल्यावर न्यायाधीश त्याच्या शिक्षणाच्या जिद्दीने भाऊक झाले. त्याच्यावरचे आरोपातून त्याला मुक्त करून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे निर्देश जिल्हा बाल संरक्षण संस्थेला दिले व येत्या काही दिवसात बालकाच्या शिक्षणाची योजना प्रस्तुत करण्याचे आदेशही दिले.

You might also like