नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते रायगड ला पोहचतील, असे धाडस ग्रुपने नियोजन केले आहे. आज दुपारी औरंगाबाद मध्ये हे तरुण सायकलवर येताच औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी  असोसिएशनचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजीतसिंग संघा, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, सोनम शर्मा, विवेक मसलेकर, राहुल अग्रवाल, डॉ. प्रशांत अवसरलमल यांनी धाडस ग्रुपच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांना शीतपेय वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला.

सामाजिक संदेश देत नागपूर ते रायगड अनोखा प्रवास…
धाडस ग्रूपच्या वतीने मुले व मुलींनी सायकल वर प्रवास नागपूर येथून सुरू केला असून आज ते औरंगाबाद मध्ये पोहचले आहेत. यात सायकलिंग करताना नागपूर ते रायगड दरम्यान जे गावे लागतात त्या गावात विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत अनोखा सायकलवर प्रवास करत आहेत. त्यात स्त्री सशक्तीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, गडकिल्ल्यांचे महत्व पटवून दिले जात आहे.  याशिवाय वाढत असलेली महागाई त्यात पेट्रोलचे वाढते दर यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सायकलचा वापर करावा, इंधन बचाव व निरोगी आरोग्यासाठी जनजागृती देखील सायकलवर प्रवास करताना युवक करत आहेत. यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. दररोज १०० ते १५९०  प्रवास पूर्ण करणार असून  या उपक्रमात वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे,  सुमित शरणागत, अविनाश कटरे,  शुभम मुंडले, निशांत निंदेकर अनिरुद्ध सोलत, राज मुंने, शरद अमगावकर यांचा सहभाग आहे. त्यांना या अनोख्या उपक्रमासाठी दत्ताजी शिर्के, महेश महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment