हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (YouTube Earning) आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोक या पर्यायांचा वापर करून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावतात. जर तुम्हीही या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. आजकाल अनेक युट्युबर्स लाखो रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. अशावेळी इतरांनाही YouTube च्या माध्यमातून लाखो रुपये कमावणं अगदी सोप्प लागतं. पण त्यासाठी नक्की काय करावं? आपले व्ह्यूवर्स आणि फॉलोवर्स कसे वाढवावे? यासाठी एका उत्तम मार्गदर्शनाच्या शोधात असाल तर त्याआधी ही बातमी जरूर वाचा.
तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर तुमचे व्हिडीओ तयार करून YouTube वर (YouTube Earning) पोस्ट करत आहात आणि यातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला थोडी जास्त मेहनत अपेक्षित आहे. कारण एकदा का तुमचे युझर्स आणि व्ह्यूज वाढले की मग पैसे कमवण्यात अडचण येत नाही. चला तर जाणून घेऊया की किती व्ह्यूजसाठी तुम्हाला किती पैसे मिळतील? तसेच या संदर्भात YouTube चे काही नियम आहेत. त्याबाबत देखील माहिती घेऊया.
फक्त व्ह्यूज वाढल्याने पैसे मिळणार नाहीत
अनेक युट्युबर्सचे व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळवताना दिसतात. पण मुळात युटूयुब व्हिडीओला किती व्ह्यूज आहेत याचा आणि कमाईचा काहीही संबंध नसतो. कारण यूट्यूबवर केवळ व्हिडीओ अपलोड करून किंवा व्ह्यूज वाढले म्हणून पैसे मिळत नाहीत. (YouTube Earning) तर युट्युबवर दिसणाऱ्या जाहिरातीद्वारे युट्युबरची कमाई होत असते. एखादा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू असताना अधे मधे दिसणाऱ्या जाहिरातीमधून युट्युबरला पैसे कमावता येतात.
आता समजा, जर तुम्ही यूट्यूबवर तुमचा एखादा व्हिडीओ अपलोड केला आणि तुमचं अकाउंट गुगलच्या अॅडसेन्सशी लिंक आहे. तर अशावेळी यूट्यूब तुमच्या व्हिडिओमध्ये जाहिराती टाकेल. त्यानंतर प्रत्येक वेळी व्हिडीओ प्ले झाल्यावर तुम्हाला ती जाहिरात दिसेल. यामुळे YouTube देखील पैसे कमावते आणि या जाहिरातींसाठी तुम्हाला सुद्धा पैसे देते.
प्रेक्षकांनी जाहिरात पाहिली तरच मिळतात पैसे (YouTube Earning)
खूप लोकांना असं वाटत की, जितके जास्त व्ह्यूज तितके जास्त पैसे. पण, यूट्यूबच्या नियमानुसार जर तुमच्या व्ह्यूवर्सने व्हिडिओसोबत जाहिरात सुद्धा पाहिली तरच तुम्हाला पैसे मिळतात. आता समजा तुमचा एखादा व्हिडीओ १ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला. (YouTube Earning) पण त्यापैकी कुणीच व्हिडिओत येणाऱ्या जाहिराती न पाहता स्किप बटणावर क्लिक केले तर तुम्हाला युट्युब पैसे देणार नाही. पण यातील किमान १० हजार लोकांनी किंवा हजार लोकांनी जरी तुमच्या व्हिडिओसोबत असलेल्या जाहिराती पहिल्या तर मात्र युट्युब तुम्हाला पैसे देईल. मुख्य म्हणजे, तुमच्या व्हिडीओवरील जाहिरात जितकी महाग असेल तितकी जास्त कमाई तुम्ही करू शकता.
सरासरी कमाई
तुमच्या युट्युब चॅनेलवरील जाहिराती प्रेक्षकांनी स्किप न करता पाहिल्या तर तुम्ही युट्युबकडून एकूण सरासरी किती कमाई करू शकता ते जाणून घेऊया. यामध्ये,
१ हजार व्ह्यूज – ४२ रुपये
२ हजार व्ह्यूज – ८५ रुपये
१० हजार व्ह्यूज – ३९० रुपये (YouTube Earning)
१ लाख व्ह्यूज – ४, ३८२ रुपये
१० लाख व्ह्यूज – ४२, ३५० रुपये
१ कोटी व्ह्यूज – ४.२१ लाख रुपये
१० कोटी व्ह्यूज – ४२.३३ लाख रुपये
१०० कोटी व्ह्यूज – ४.२३ कोटी रुपये इतकी कमाई होऊ शकते.