YouTube New Policy 2025 : YouTube वरून पैसे कमवणे झालं अवघड!! 15 जुलैपासून नियम बदलले

YouTube New Policy 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनYouTube New Policy 2025 । सध्या सर्वत्र Youtube चे फॅड सुरु आहे. जो तो उठतोय आणि स्वतःच नवीन युट्युब चॅनेल काढतोय.. उद्देश एकच ते म्हणजे युट्युब वरून पैसे कमवणे… अनेकांनी युट्युबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत. युट्युबचे वारं सध्या जोरदार बघायला मिळत आहे. मात्र आता येत्या १५ जुलै पासून युट्युब ने काही नियमात बदल केले आहेत, ज्यामुळे पैसे कमवणे आधी पेक्षा कठीण होणार आहे. बदललेल्या नियमांनुसार, आता युट्यूब फक्त मूळ आणि नवीन कंटेंट तयार करणाऱ्यांनाच व्हिडिओंमधून कमाई करण्याची संधी देईल. युट्यूबला प्रत्येक चॅनेलप्रमाणे नवीन आणि मूळ कंटेंट मिळावा अशी इच्छा आहे त्यासाठीच कंपनीने नवीन नियम लागू केले आहेत.

गुगलच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, आता YouTube पार्टनर प्रोग्राम अंतर्गत मास प्रोड्यूस्ड आणि रिपेटिव्ह कंटेट ओळखण्याची आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आणखी कडक (YouTube New Policy 2025) करण्यात येणार आहे. एखाद्या क्रिएटरच्या व्हिडिओला किती व्हीव्हज येतात यापेक्षा प्रेक्षकांना माहिती देणारा कन्टेन्ट कोणता आहे किंवा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा व्हिडिओ कोणता आहे? यावर युट्युब लक्ष्य केंद्रित करणार आहे. आत्तापर्यंत युट्युबचे धोरण बघितलं तर YouTube ने नेहमीच ओरिजनल कंटेटला प्रोत्साहन दिले आहे. हे धोरण त्या दिशेने आणखी एक पाऊल असणार आहे.

काय आहेत नवीन नियम- YouTube New Policy 2025

युट्यूबच्या नवीन धोरणानुसार, आता जर एखाद्या क्रिएटरला युट्युबच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर त्याचा विडिओ हा मूळ विडिओ असावा.. दुसऱ्या कोणाचा तरी वापरलेला विडिओ आपल्या युट्युब चॅनेल वर टाकला तर पैसे मिळणार नाहीत..

वारंवार तोच तोच कंटेट रिपीट करणाऱ्या चॅनेलवाल्यांना सुद्धा धक्का बसणार आहे. अशा चॅनेलला पैसे मिळणार नाहीत. YouTube New Policy 2025

मोठ्या बदलांशिवाय इतर कोणाचाही कंटेट वापरला जाऊ शकत नाही. जर दुसऱ्या कोणाचा कन्टेन्ट घेतला तरी त्यात जास्तीत जास्त बदल करावा जेणेकरून तो नवीन कंटेन्ट आहे असच वाटावं… यासाठी तुमच्या स्वतःच्या डोक्यातील स्क्रिप्ट सदर कन्टेन्ट मध्ये टाकावी

अलीकडच्या काळात यूट्यूब आणि इतर व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एआय व्हिडिओंचा वापर करण्यात येत असल्याचं सातत्याने दिसत आहे. अशा विडिओ वर सुद्धा युट्युब कडून कारवाई करण्यात येईल. AI चा वापर करुन तयार केलेल्या व्हिडिओला आता पैसे मिळणार नाहीत.