पुस्तकांच्या दुनियेत | सदाशिव फाळके
युवाल नोआ हरारी याची आधीची सेपिअन्स आणि होमो डेअस ही दोन्ही पुस्तके जगभर चांगलीच गाजली व त्यांवर भरपूर चर्चाही झाली. सेपिअन्समध्ये मानवजातीचा भूतकाळ व होमो डेअसमध्ये मानवजातीचे भविष्य यावर लिहून झाल्यावर हरारी या पुस्तकातून आता वर्तमानाकडे आपल्याला नेतो. वर्तमान जगाविषयी काळजी तर सगळ्यांनाच वाटते पण हरारी आपल्याला या पुस्तकात नेमकी काळजी करण्यासारखी गोष्ट कोणती ? मानवजातीपुढील खरीखुरी आणि मोठी आव्हाने कोणती आहेत ? आपल्या मुलांना भविष्याच्या दृष्टीने आपण खरंच काय शिकवले पाहिजे ? अशा प्रश्नांकडे नेतो.
या पुस्तकात तंत्रज्ञानाचे आव्हान, रोजगार, राष्ट्रवाद, धर्म, स्थलांतर, दहशतवाद, युद्ध, धर्मनिरपेक्षता, देव आणि इतर महत्वाच्या विषयांवर सर्व मिळून २१ धडे आहेत. प्रत्येक विषयावर त्याने केलेली मांडणी केवळ अभ्यासपूर्णच नाही तर नाविन्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ रोजगाराविषयी बोलतांना तो म्हणतो भविष्यात माहिती तंत्रज्ञानामुळे नाही तर माहिती आणि जैव तंत्रज्ञानाच्या संयोगामुळे रोजगारांना धोका आहे. पण त्याचवेळी तो हेही सांगतो की Algorithm आणि Biometric sensers मुळे अब्जावधी लोकांना आरोग्यसेवा मिळेल. नवीन तंत्रज्ञान रोजगाराच्या संधी कमी करेल पण केवळ माणसांचे रोजगार जातील म्हणून वाहतूक व आरोग्यसेवे सारख्या महत्वाच्या क्षेत्रातील automization रोखून धरणे वेडेपणाचे ठरेल.
पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजेत, संग्रही ठेवली पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटतं. वाचण्याची आवड माणसाला अधिक समृद्ध बनवते. वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय काही दर्जेदार पुस्तकं – फक्त एका क्लिकवर. ही पुस्तकं तुम्हाला सवलतीच्या दरात मिळतील एवढं मात्र नक्की. पुढे जाण्यासाठी क्लिक करा –
https://behumanist.com/?ref=hellomaha
श्रीमंत लोक आपल्याकडील उच्च क्षमतांचा वापर करून अधिकाधिक समृद्ध होतील आणि अतिरिक्त पैश्यातून ते अधिक विकसित देह तसंच मेंदू विकत घेऊ लागले तर काळानुसार ही दरी वाढतच जाईल, श्रीमंतांकडे केवळ जगातील बहुतांश संपत्तीचं नसेल, तर जगातील सौन्दर्य, सर्जनशीलता आणि आरोग्यही असेल.
राष्ट्रवादाविषयी त्याने केलेले विधान डोळे उघडणारे आहे, तो म्हणतो “देशभक्ती म्हणजे परदेशी लोकांचा द्वेष करणे नाही तर स्वदेशीयांची काळजी घेणं म्हणजे देशभक्ती”. धर्माविषयी त्याचे मत आहे की सर्व पारंपरिक धर्म मानवजातीची समस्यांमधून सुटण्याचा मार्ग दाखवत नाही, उलट त्या समस्यांमध्ये भर घालतात.
सर्वच धडे गंभीर व मानवजातीच्या अस्तित्वाशी निगडित विषयांवर असले तरी पुस्तक अजिबात बोजड किंवा रटाळ नाही आहे. कठीण विषय सोपा आणि रंजक करून सांगण्यात हरारीचा हातखंडा तर आहेच पण पुस्तक मराठीत अनुवाद करतांनाही अनुवादक सुनील तांबे यांनी योग्य ती काळजी घेतली आहे. जगभर गाजलेले हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे असेच आहे.
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची किंमत: ५०० रु
हे पुस्तक १०% सवलतीच्या दरात behumanist.com वर उपलब्ध आहे.