‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टीम इंडियामध्ये पदार्पण केल्यानंतर पंतचा प्रवास खूप खडतर होता. बेजबाबदारपणे विकेट फेकणं आणि अनावश्यक शॉट खेळल्यामुळे अनेकवेळा पंतवर टीका करण्यात आली होती.

आयपीएल 2020 मध्येही पंतची कामगिरी निराशाजनक झाली.यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल करून स्वत:ची प्रतिमा बदलली. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फास्ट बॉलर्सचा त्याने उत्कृष्ट सामना केला आणि त्यांच्यावरच उलट आक्रमण केले. त्याच्या या खेळीने भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला होता. 2007 आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकवणाऱ्या युवराजच्या मते ऋषभ पंत आता परिपक्व झाला आहे. ‘मी ऋषभ पंतकडे पाहत आहे, त्याला स्वत:ला ऍडम गिलख्रिस्ट आवडतो, जो आपल्या एकट्याच्या खेळाने मॅचचा निकाल बदलू शकतो. गिलख्रिस्टने टेस्ट क्रिकेटचा खेळच बदलला. मला वाटते पंतही असे करू शकतो असे युवराजने एका मुलाखतीत सांगितले आहे.

तसेच युवराज सिंग पुढे म्हणाला, ‘ऋषभ पंतकडे मी टीम इंडियाचा संभाव्य कर्णधार म्हणून बघतो. कारण तो मैदानात नेहमी सक्रीय असतो. तसंच तो टीममधल्या खेळाडूंशी सतत बातचित करत असतो. पंतकडे स्मार्ट डोके आहे. आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करताना त्याने याची झलक दाखवून दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्याला मी टीम इंडियाच कर्णधार म्हणून बघत आहे,’ असे युवराज सिंग म्हणला आहे.

Leave a Comment