चौथीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्यध्यपकाला बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | बेटी पढाओ बेटी बढाओच्या नाऱ्यात केंद्र आणि राज्य सरकार रममाण आहे. अशात राज्यात १५ ऑगस्ट दिवशीच शिक्षकी पेशाला काळिंबा लावणारा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची या गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुख्यध्यापक याला १५ ऑगस्ट कार्यक्रमच्या ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर अटक केली आहे. चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुली सोबत अश्लील चाळे करत असल्याचे मुलीने तीच्या आईला सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांनी शाळेत येऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होताच मुख्यध्यापकाची धुलाई करण्यास सुरुवात केली.

खासदार सुनील तटकरेच्या कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्याध्यापकाला मारत असताना खूप आरडा ओरडा सुरु झाला. त्यामुळे गावाचे पोलीस पाटील नागोराव कोंडीबा काकळे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो निलेश बलसाने यांनी पोलिसांनी फोन करून बोलवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परोशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी घटना स्थळी धाव घेऊन मुख्यध्यापकाला अटक केली आहे.

९ वेळा काँग्रेसचे लोकसभा खासदार राहिलेल्या नेत्याची मुलगी जाणार शिवसेनेत

मुख्यध्यापकाला अटक होताच अन्य तीन मुलीचे पालक देखील समोर आले आहेत. त्यांच्या मुलीसोबत देखील हा मुख्यध्यापक अशीच कृत्य करत होता. मुलीचा विषय म्हणून या पालकांनी मुलींनी सांगून देखील गप्प राहणे पसंत केले होते. अशा सर्व प्रकारामुळे शिक्षकी पेशा बदनाम होतो आहे. दरम्यान त्या आरोपी मुख्यध्यापकावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur