शरद पवारांचा अमरावती दौरा; सुरक्षेसाठी गृहविभागाकडून ‘इतकी’ यंत्रणा तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज पवार अमरावतीत दाखल झाले असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून चार जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची संवाद बैठक आज अमरावतीत होत आहे. त्यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दोन दिवसांपुर्वी पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गदारोळ केला होता. त्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाला आहे. या हल्ल्यामुळे शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला देखील 2000 लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.