नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. सध्या अशाच एका कपलचा (Couple Fight) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका टी-शर्टवरून वाद घालताना (Couple Fight) दिसत आहेत. हा व्हिडीओ दिल्लीतील मेट्रोमधील आहे. ज्यामध्ये दोघेही ‘झारा’च्या टी-शर्टवरून वाद घालताना (Couple Fight) दिसत आहेत. या व्हिडीओनुसार, मुलगी एक टी-शर्ट आणते, ज्याची किंमत हजार रुपये आहे. यानंतर मुलगा म्हणतो की या टीशर्टची किंमत दीडशे रुपयांपेक्षा जास्त नाही! मुलीला याचा राग येतो, त्यानंतर ती त्या मुलावर हात उगारते.
‘Zara’च्या टी – शर्टवरून दिल्लीच्या मेट्रोमध्ये जोडप्यामध्ये हाणामारी pic.twitter.com/W8BgrpqNQT
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 17, 2022
यानंतर मुलगा तिला हात न उगारण्याची चेतावणी देतो आणि आपण सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे भान राखण्यास सांगतो. यानंतर, मुलगी पुढे जाताच तो तिला तिथून निघून जाण्यास सांगतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद (Couple Fight) होतो आणि ती मुलगी त्याला एका मागोमाग एक थप्पड मारते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलगा म्हणतो, ‘तू गप्प बस, माझ्यासमोरून निघून जा.’ यानंतर मुलगी गेटजवळ येते आणि ‘माझ्या आयुष्यात येऊ नकोस’ असे म्हणते आणि त्यानंतर त्या मुलाला आणखी एक थप्पड (Couple Fight) मारते. यावेळी तो मुलगा बदला घेत मुलीला थप्पड मारतो आणि म्हणतो, ‘थांब, तुला सांगतो.’ हे बोलल्यावर मुलगी त्याला पुन्हा थप्पड मारते आणि म्हणते, ‘मी आईला सांगेन…तुझ्यासारखा मुलगा कोणालाही न मिळो.’ यानंतर मेट्रोचा दरवाजा उघडतो आणि दोघे निघून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर