कारपेक्षा वेगाने धावले झेब्रा अन् घोडा, मालकापासून ‘अशी’ मिळवली सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर,आजकाल चकित करणारं काहीतरी व्हायरल होटच असतं.असंच काहीसं पॅरिसच्या रस्त्यावर देखील घडले आहे,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. पॅरिसमधील सर्कसमधून झेब्रा आणि दोन घोडे धावत धावत रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर वेगाने धावण्यास सुरवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रस्त्यावर असेच धावत असताना झेब्रा आणि घोड्याने लोकांना चकित केले. वास्तविक,हे प्राणी ऑर्मेसन-सूर-मार्ने शहरात असलेल्या सर्कसमधून पळून गेले होते. हफिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हे प्राणी फ्रेंच राजधानीच्या हद्दीतील ऑर्मेसन-सुर-मार्ने येथे शहरात फिरताना दिसले.

 

या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की झेब्रा आणि घोडे रस्त्यावर कसे धावत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर २ लाखाहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. सर्कसचा मालक मौलोट म्हणतो की, “जनावरांच्या तबेल्याचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे हे लोक येथून निसटून गेले. हे प्राणी फक्त १५ मिनिटांसाठी बाहेर होते आणि तेवढ्यातच लोकांनी त्यांचे व्हिडीओ शूट केले.

 

 

ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जनावर रस्त्यावर धावताना दिसला आहे. या व्हिडिओला येथे १० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये हे जनावर मजेने धावताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment