Zee -Sony विलीनीकरणाला बोर्डाकडून मान्यता, पुनीत गोयंका असणार विलीन झालेल्या संस्थेचे MD-CEO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । झी आणि सोनी यांच्या मंडळाकडून विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. Zee Entertainment Enterprises Ltd च्या संचालक मंडळाने 22 डिसेंबर रोजी Sony Pictures Networks India (SPNI) मध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. मंडळाने सांगितले की,”विलीन झालेल्या संस्थेमध्ये सोनीची 50.86 टक्के भागीदारी असेल.”

विलीनीकरणाबाबत, Zee च्या बोर्डाने सांगितले की,” कंपनी टीव्ही कंटेंट डेव्हलपमेंट, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनेल, चित्रपट, संगीत प्रसारण आणि डिजिटल सेक्टर या गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन नेटवर्क कंपन्यांपैकी एक आहे.”

पुनीत गोएंका यांना एमडी आणि सीईओ बनवण्यास सहमती
झी-सोनी डीलचा 90 दिवसांचा Due Diligence Period मंगळवार, 21 डिसेंबर रोजी संपला. 22 सप्टेंबर रोजी दोघांनी यासाठी Non-Binding करारावर स्वाक्षरी केली होती. यानंतर, गुंतवणूकदार Due Diligence प्रक्रियेच्या निकालाची वाट पाहत होते. विलीनीकरणाची घोषणा करताना, झीने सांगितले होते की, SPNI ने पुनीत गोयंका यांना विलीन झालेल्या संस्थेचे MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यास सहमती दर्शविली आहे आणि हा कराराचा अविभाज्य भाग होता.

व्यवसायात तेजी येईल
या विलीनीकरणाबाबत विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ” झी आणि सोनी एकत्र आल्याने या दोन्ही कंपन्यांमध्ये कमालीचा समन्वय निर्माण होईल. त्यामुळे व्यवसाय आणि क्षेत्राला चालना मिळेल. या विलीनीकरणामुळे 26 टक्के प्रेक्षकांच्या सहभागासह भारतातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क तयार होईल. याव्यतिरिक्त, Q1FY22 डेटानुसार झी-सोनी हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल (GEC) विभागामध्ये संयुक्तपणे 51 टक्के हिस्सा धारण करेल. झी-सोनी युनिटला हिंदी चित्रपटांची 63 टक्के प्रेक्षकसंख्या असेल.”

Leave a Comment