हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना आणलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा फायदा होईल. आणि त्यांना आर्थिक हातभार लागेल. राज्य सरकारने सर्व सामान्य माणसांसाठी वीज क्षेत्रात देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. नागरिकांना कमीत कमी वीज बिल (Electricity Bill) यावे, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. अशातच राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील आणलेली आहे. यासोबतच केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्य घर योजना आहे. या योजनेतून वीज ग्राहकांचे वीज बिल देखील आता शून्य होणार आहे. लवकरच सरकार या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आणि ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती रविवारी 18 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूप खुश झालेले आहेत.
सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे सौर उर्जीकरणाचे काम सुरू केलेले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी म्हणून एक गाव आहे. या गावांमध्ये महावितरणाच्या वतीने 100 टक्के सौरऊर्जीकरण करण्यात आलेले आहे. राज्यातील पहिले सौरग्राम या मान्याची वाडी झालेले आहे. यावेळी लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्याबद्दल बोलत होते. वीज क्षेत्रात ही कामगिरी केल्यामुळे त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना मोफत वीज दिल्यामुळे त्या गावचे सरपंच रवींद्र माने यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले, त्यांना धन्यवाद देखील म्हटले. या सौरग्राम असलेल्या मान्याची वाडी लोकार्पण करताना, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री ऊर्जा आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री शंभूराजे देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे सगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ही सौरग्राम होण्याचा पहिला मान मिळवलेला आहे. या गावातील सगळ्या नागरिकांचे मी अभिनंदन करतो, सौर ऊर्जा ही घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी वरदानच आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवला जातो. त्यामुळे विज बिल त्यांना अजिबात येत नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील मागील त्यांना सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे. खुल्या वर्गातील जे प्रवर्ग आहेत, शेतकरी आहेत त्यांना 10 टक्के रक्कम, अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून कृषी पंप आणि सौर पॅनल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम आहे ती शासनाकडून अनुदानाच्या रूपात मिळेल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे.