Sunday, April 2, 2023

Zerodha ने दिली माहिती, युझर्सना शेअर्स विकण्यात येऊ शकते अडचण; काय आहे प्रकरण जाणून घ्या

- Advertisement -

मुंबई । देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ब्रोकरेज फर्मपैकी एक असलेल्या Zerodha च्या युझर्सना आज शेअर्स विकण्यात अडचणी येऊ शकतात. कंपनीने आपल्या युझर्सना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आज त्यांना अधिकृत स्टॉक विक्रीमध्ये अडचणी येऊ शकतात. कंपनीने सांगितले की, आज CDSL मध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत, ज्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Zerodha ने अधिकृतपणे 18 ऑक्टोबर रोजी नोटीस जारी केली आहे, त्यात म्हटले आहे की, “CDSL मध्ये गडबड असल्याने अधिकृत शेअर्सच्या विक्रीमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आम्ही सीडीएसएलच्या सतत संपर्कात आहोत आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. ”

- Advertisement -

कंपनीने तांत्रिक त्रुटीचा मेसेज देण्यात आला होता
Zerodha ने आपल्या ग्राहकांना तांत्रिक बिघाडाचा मेसेज देण्यात आला होता. मात्र, नंतर कंपनीने दुसरा मेसेज पाठवला ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की, आपण CDSL ऑथरायझेशन वगळून आपले शेअर्स विकू शकता. युझर्सना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून Zerodha ने CDSL ऑथरायझेशन तात्पुरते बंद केले आहे.

CDSL वरील रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म Grow ने आपल्या युझर्सना आज तांत्रिक अडचणींविषयी माहिती दिली. वास्तविक, CDSL मध्ये तांत्रिक बिघाडामुळे आज त्याच्याशी संबंधित सर्व ऑनलाइन ब्रोकरेज कंपन्यांमध्ये समस्या आहे. ग्रोव म्हणाले, “ CDSL ला TPIN चे व्हेरिफिकेशन करण्यात अडचण येत आहे, ज्यामुळे युझर्सना अधिकृत शेअर्स विकण्यात समस्या आहे. 30 सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार Zerodha युझर्सची संख्या 49 लाख आहे.