हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
आजार म्हटलं की, औषधोपचार आले. मात्र, पूर्णपणे बर व्हायचं असेल तर त्यासाठी योग्य उपचार, संतुलित आहार आणि वैयक्तिक स्वच्छता महत्वाची असते. दरम्यान, झिका व्हायरस आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे तज्ञांनी आहाराबाबत काय आणि कशी काळजी घ्यावी? (Zika Virus) झिका व्हायरसच्या प्रभावातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा? याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-
आपले शरीर हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या
कोणत्याही आजरातून लवकर बरे व्हायचे असेल तर आपल्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या होणार नाही याची काळजी घ्या. त्यात झिका व्हायरसची लागण झाली असेल तर रुग्णाचे शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. (Zika Virus) कारण, जेव्हा आपले एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक द्रव्याची गरज असते. जेणेकरून शरीरातील विषारी घटक व संसर्ग शरीराबाहेर उत्सर्जित होतील.
द्रव पदार्थ (Zika Virus)
झिका व्हायरसच्या रुग्णांनी ज्या पदार्थांमध्ये द्रव्य मात्रा सर्वाधिक आहे, अशा पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत होते. पाण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि विविध फळांचे ज्यूस पिणे या काळात फायदेशीर ठरेल. काकडी, संत्री, शहाळ, किवी अशा फळांचे सेवन करावे. कारण यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. जे रुग्णाचे शरीर हायड्रेटेडसुद्धा ठेवते आणि तोंडाची गेलेली चव परत येण्यासही मदत करते.
प्रथिनयुक्त पदार्थ
झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती कमी हौस शकते. (Zika Virus) शिवाय रुग्णाच्या शरीरातील स्नायूदेखील कमजोर होतात. अशावेळी रुग्णाला अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी आपल्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये विविध डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी मदत होते.