Air India Express : स्वस्तात विमानप्रवास करण्याची संधी ; केवळ 883 रुपयांमध्ये मिळणार फ्लाइट तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Air India Express : तुम्हीही कुठेतरी सुट्टीला फिरायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) ग्राहकांसाठी फ्लाइट तिकिटांवर एक विशेष ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त 883 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर बद्दल …

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) त्यांच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठा स्प्लॅश सेल सुरू केला आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त 883 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फ्लाइट तिकिटे मिळतील. याशिवाय त्यांना या ऑफरमध्ये इतरही अनेक फायदे मिळणार आहेत. या ऑफरमध्ये ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी फ्लाइट तिकीट बुक करू शकतात. मात्र बुकिंगची अंतिम तारीख 28 जून 2024 आहे.

कुठे कराल संपर्क ? (Air India Express)

यासोबतच ग्राहकांना 350 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळते आहे. ही सुविधा शुल्क माफी ग्राहकांना Xpress Lite वर उपलब्ध आहे, ज्यासाठी त्यांना Air India Express (www.airindiaexpress.com) च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

जेवण आणि सीट बुकिंगवरही सवलत

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या सर्वात मोठ्या स्प्लॅश सेल ऑफरमध्ये ग्राहकांना बिझनेस आणि प्राइम सीट्सवर 50 टक्के सवलत, खाद्यपदार्थांवर 25 टक्के सूट आणि शीतपेयांवर 33 टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही विमान प्रवास करणार (Air India Express) असाल तर नक्की या सुविधेचा लाभ घ्या.