खुशखबर ! रेल्वेतही मिळणार Zomato ची सेवा ; IRCTC आणि Zomato यांच्यात मोठा करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जर तुम्हाला ट्रेनमध्ये चविष्ट जेवण खावेसे वाटत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना झोमॅटोवर तुमचे आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकता आणि ते थेट तुमच्या सीटपर्यंत पोहचेल. या सेवेद्वारे, कंपनीने आतापर्यंत देशातील 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना 10 लाखांहून अधिक ऑर्डर वितरित केल्या आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…

झोमॅटोच्या सीईओनी दिली माहिती

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी X वर रेल्वेसोबतच्या या भागीदारीची माहिती दिली. त्यांनी पोस्ट शेअर करून सांगितले की, आता IRCTC सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर थेट तुमच्या ट्रेनच्या डब्यात जेवण पोहोचवले जाते. आम्ही ट्रेनच्या 10 लाख ऑर्डर आधीच पूर्ण केल्या आहेत. तुमच्या पुढच्या प्रवासात नक्की ऑर्डर करून पहा!’

ही घोषणा होताच नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. एका युजरने प्रश्न केला आहे की जर ट्रेनला उशीर झाला तर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय येईल का ? ही चांगली गोष्ट आहे की झोमॅटो कडून ही नवी सोय करण्यात आलेली आहे. पण जर समजा जर एखाद्या प्रवाशाने रेल्वेमध्ये बसून खाद्यपदार्थ ऑर्डर केले आणि जर ट्रेन एक वाजता पोहोचण्याऐवजी तीन वाजता स्टेशनवर पोहोचली तर डिलिव्हरी बॉय इतका वेळ वाट पाहतो? असा सवाल एका युजरने केला आहे. शिवाय आणखी एका युजरने म्हटले आहे की ऑर्डर साठी कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय चांगला राहील.