Zomato Share : आतापर्यंतच्या उच्चांकावरून 65% घसरण्याचे कारण काय? गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share शुक्रवारी NSE वर 57.65 रुपयांवर पोहोचले. झोमॅटोच्या शेअर्सची हि नीचांकी पातळी समजली जात आहे. Zomato चा शेअर आज एक दिवस आधीच्या तुलनेत 1.85 रुपयांनी कमी होऊन उघडला आणि नंतर 57.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2021 मध्ये 169 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर झोमॅटोचा स्टॉक गेल्या 4-5 महिन्यांत 65 टक्क्यांनी घसरला आहे.

loading widget to trade ZOMATO

झोमॅटो करत आहे कॅश फ्लोचा सामना

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, झोमॅटोला कॅश फ्लो चा सामना करावा लागत आहे. झोमॅटोचे बिझनेस मॉडेल मोठ्या प्रमाणावर व्हॉल्यूमवर अवलंबून आहे. खरं तर, झोमॅटोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही जगभरात याच समस्येचा सामना करावा लागत आहे. आजकाल गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, नायका इत्यादी टेक स्टॉक्सना मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करावा लागत आहे. भविष्यात झोमॅटोचा शेअर अजून घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

झोमॅटोसाठी कॅश फ्लो ही एक मोठी समस्या आहे. कारण कंपनीची ऑपेरेशनल कॉस्ट खूपच जास्त आहे. कंपनी आतापर्यंत कॅश फ्लो कमी करू शकली नाही. त्यामुळे झोमॅटोचे नुकसान होत आहे. झोमॅटोचे बिझनेस मॉडेल आपण बारकाईने पहिले तर त्यांच्याकडे किमती वाढवण्याचे आणि त्याच्या ऑपरेशनल रेव्हेन्यू पेमेंट्सची पूर्तता करण्यासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध असल्याचं आपल्या लक्षात येईल.”

प्रॉफिट आणि कॅश फ्लो कंपनीसाठी गरजेचे आहेत (Zomato Share)

सध्याच्या दर वाढीच्या परिस्थितीचा कंपनीच्या शेअर्सवर लक्षणीय परिणाम झाला आहे. कंपनीच्या महसुलात वाढ होण्यापेक्षा सदर कंपनीचा नफा आणि कॅश फ्लो हे अधिक महत्वाचे आहेत हे आता गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे, झोमॅटोच्या शेअर भारतातील आजपर्यंतच्या उच्चांकावरून ६५ टक्क्यांनी खाली घसरला आहे.

गुंतवणूकदारांना सल्ला –

सध्या झोमॅटोचे दिवस वाईट चालले असले तरी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल कि झोमॅटोला अजून मार्केटमध्ये कोणी मोठा कॉम्पिटेटोर नाही. आज ना उद्या झोमॅटो फायद्यात येणारच आहे. तेव्हा छोट्या गुंतवणूकदारांनी आत्ता हे शेअर विकत घेतले तर कदाचित ते फायद्यात राहू शकतात. मात्र याकरता आपल्याला ६ महिन्यांची वाट पाहायला लागेल.

 

Leave a Comment