जून 2021 च्या तिमाहीत Zomato चा तोटा वाढला, तरीही आज कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 9 टक्क्यांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2021 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा वाढून 360.7 कोटी रुपये झाला. यापूर्वी एप्रिल-जून 2021 तिमाहीत कंपनीला 99.80 कोटींचे निव्वळ नुकसान झाले होते. कंपनीचे म्हणणे आहे की, सर्व खर्चात वाढ झाल्यामुळे, तोट्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये, Zomato ने IPO सादर केला, ज्याला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. IPO नंतर, Zomato च्या शेअर्समध्ये लोकांच्या वाढत्या आवडीचा परिणाम म्हणजे आज म्हणजेच 11 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीचा शेअर 9.35 टक्क्यांनी वाढून 136.90 रुपये झाला.

Zomato चा एकूण खर्च 1,259 कोटी रुपयांवर पोहोचला
Zomato ने सांगितले की जून 2021 च्या तिमाहीत सर्वाधिक सकल ऑर्डर मूल्य (GOV), ऑर्डरची संख्या, व्यवहार करणारे यूजर्स, सक्रिय रेस्टॉरंट पार्टनर आणि सक्रिय डिस्‍ट्रीब्‍यूशन पार्टनर नोंदवले गेले. पहिल्या तिमाहीच्या निकालांनुसार, जून 2021 च्या तिमाहीत ऑपरेशन्समधून कंसोलिडेटेड रेवेन्यु 844.4 कोटी रुपये होता, जो जून 2020 च्या तिमाहीत 266 कोटी रुपये होता. कंपनीने म्हटले आहे की,” चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण खर्च वाढून 1,259.7 कोटी रुपये झाला आहे जो गेल्या वर्षीच्या 383.3 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त होता. कंपनीचा एडजस्टेड रेवेन्यु 26 टक्क्यांनी वाढून 1,160 कोटी रुपये झाला.

Zomato चा स्टॉक आता किती वाढू शकेल ?
मार्केटमधील एक्सपर्टच्या मते, Zomato ची कामगिरी बरीच चांगली आहे. त्याचबरोबर मागणीतही सुधारणा अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत Zomato चा स्टॉक 165 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीची कमाई देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत त्याचा स्टॉक 170 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीची वाढ पाहता लोकांनी Zomato चा IPO घेतला. आज सकाळी Zomato चा स्टॉक घसरला आणि 123.30 रुपयांवर उघडला. मंगळवारी कंपनीचा शेअर 125.20 रुपयांवर बंद झाला.

Leave a Comment