शेतकऱ्याची करामत ; चक्क दुचाकीच्या साहाय्याने काढले मक्याचे दाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेती करणे खरंतर सोपी गोष्ट नाही. रोज शेतकऱ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. हवामान, पाऊस अशा नैसर्गिक घटकांवर बऱ्याच अंशी शेतकऱ्याला अवलंबून राहावे लागते.  आणि यानंतर पुन्हा बाजार भावाच्या बाबतीतही मोठे आव्हान असतेच. आपल्या जीवनशैलीतील अशा घटकांना सामोरे जाण्यासाठी त्याला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतातच त्यामुळे शेतकऱ्याला नेहमीच संयमी आणि सृजनशील असणे आवश्यक असते तरच तो या परिस्थितीतून मार्ग काढू शकेल. भारतातील लोक विविध व्यवसायात गुंतले आहेत, परंतु शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. याउलट, जरी ते अर्थव्यवस्थेचा कणा आहेत तरीही त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्याचा केवळ त्यांनाच नव्हे तर इतर लोकांवरही परिणाम होतो.

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर अधिक होत आहे. पण सर्वच शेतकरी यंत्राचा वापर करु शकत नाहीत. परंतु आपल्याकडील अल्प साधनातही बळीराजा आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर श्रम कमी करुन कामे जलदगतीने पूर्ण करत असतात. ही सर्व साधने देशी जुगाडची असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल  मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील शेतकरी बांधव मोटरसायकलच्या मदतीने मक्याची दाणे वेगळे करत आहेत.

यामुळे त्यांच्या वेळेची बचत होऊन मजुरांचा खर्चही कमी झाला. दरम्यान याचा व्हिडिओ महिंद्रा अँण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा जुगाडचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.  मका उत्पादकांनी मका कापपणीनंतर मक्याचे दाणे काढण्यासाठी मोटारसायकलचा उपयोग केला. मोटरसायल उभी करुन ती चालू केली मोटारच्या गतीने मागील चाक फिरु लागले.  त्या फिरत्या चाकाच्या एका बाजुला मक्याचे कणीस लावून मक्याचे दाणे काढली. शेतकऱ्यांचा हा जुगाड पाहून प्रशासनाने त्यांना यंत्राचे प्रशिक्षण दिल्यास शेतकरी नक्कीच त्याचे सोने करतील यात शंका नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like