नागपूर प्रतिनिधी | निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ हलबा समाजाने स्थानिक गोळीबार चौकात तांडव आंदोलन करीत आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष सर्वांचे वेधले. अंगाला झाडाची पाने गुंडाळून युवकांनी सादर केलेले पारंपरिक दंडार नृत्य आंदोलनचे आकर्षण ठरले .
‘हलबा एकता जिंदाबाद’, ‘गर्व से कहो हम आदिवासी है,भारत के मुलं निवासी है’, ‘केंद्र सरकार और राज्य सरकार होश मे आओ’, आदी घोषणा देत ,मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आंदोलकांनी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. हलबा क्रांती सेने तर्फे आमदार विकास कुंभारे यांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या चौकातच आदिवासीच्या वेशात आंदोलन करण्यात आले.