यवतमाळ प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा इथं वास्तव्यास असलेले लखमा कोंडेकर मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पैसे काढण्याकरिता आले असता त्या बँकेतूनच त्यांचे पैसे चोरी झाले. ही सगळी घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की या वृद्धान एका अनोळखी इसमास पैसे काढण्याची पावती लिहून मागितली. त्यावर २ हजार रुपये लिही अस सांगितल. परंतु अज्ञानाचा फायदा घेत चोरट्याने १० हजार रक्कम लिहली रोखपाल यांच्याकड पावती दिली, त्यांनी १० हजार रुपये वृध्द इसमास दिले असता अनोळखी चोरट्यान मी पैसे मोजुन देतो असे सांगितले. तर त्या आजोबांनी १० हजार कशाला काढले आहे म्हणताच, ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी बसणाऱ्या साहेबांकडून ८ हजार पुन्हा बँकेत जमा करण्याकरिता सही घ्यावी लागते असे म्हणत तुम्ही माझ्या सोबत चला तेवढ्यात चोरट्याने रोकड खिशात घातली, वृद्ध इसमास दुचाकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले साहेबाची सही आणतो असे सांगून वृद्धास दुचाकीवरून उतरविले आणि चोरटा रोकड घेऊन लंपास झाला.
घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा चोरटा परिसरातील नागरिकांनी पहिल्यांदा बघितला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लखमा यांच्याकडे अल्प शेती आहे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. वृद्ध पती-पत्नी दाम्पत्य शेतात दिवसभर मशागत करतात. जमीन हलक्या स्वरूपाची असल्यान फारस उत्पन्न होत नाही. अशा परिस्थीतही वृद्धपकाळात उदरनिर्वाह करण्याकरिता ३४ हजार रुपये जमा केले होते.
घडलेल्या प्रकारची पोलिसात घोगुलदारा येथील सरपंच तुकाराम आस्वले यांच्या समक्ष तक्रार दाखल करून अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हे वृद्ध आजोबा पोळा या सणाकरिता बाजारातून वस्तू खरेदी करण्यासाठी सोमवारी बँकेतुन २ हजार रुपये काढण्याकरिता आले होते.