अमरावती प्रतिनिधी। आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदिवासी मंत्रालयाकडून आदिवासी विभागाला करोडो रुपयाची तरतूद केली जाते. मात्र आदिवासी विभागाकडून ती रक्कम खर्च केली जात नाही. त्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले .
परिणामी शिल्लक रक्कम सरकारकड परत केली जाते. अमरावती शहरात जवळ पास 8 आदिवासी मूलामुलींची वसतिगृह आहेत. मात्र हे सगळे वसतिगृह खाजगी इमारतीमध्ये आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. शासकीय जमीन आदिवासी विभागला 2015 ला हस्तांतरित करण्यात आली. मात्र अजून शासकीय जमिनीवर इमारत बांधकाम सुरू केल नाही.
या खाजगी इमारतीमध्ये अनके सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी आदिवासी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. तसेच आज इथं विद्यार्थ्यांनी मुंडन आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा पट्टयांत केला.