अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत,देव नाहीत : असुद्दीन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक अधिकार देणारे विधेयक काल संसदेत मांडण्यात आले. त्यावर माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी खासदार सत्यपाल सिंह लोकसभेत बोलत होते. तेव्हा त्यांच्या भाषणाला हरकत घेत ओवेसी सभागृहात बोलण्यासाठी उठले तेव्हा अमित शहा यांनी ओवेसी यांना सुनावण्याचा प्रयत्न केला. या शाब्दिक चकमकीवर आता चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

अमित शहा यांनी मला सभागृहात धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत देव नाहीत अशी जहरी टीका ओवेसी यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे. मुंबईला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी नेहमीच दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने बघितले आहे. त्याच प्रमाणे मी पोलीस अधिकारी असताना हैद्राबादमध्ये दहशतवादाशी संबंधित असणाऱ्या तरुणांना अटक केली. तर आयपीएस अधिकाऱ्याला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे मुख्यमंत्र्यानी आदेश दिले. एवढेच नाही तर तपास थांबवला नाही तर नोकरी घालवण्याच्या देखील धमक्या दिल्या गेल्या. सत्यपाल सिंह याच्या याच विधानाला आक्षेप घेण्याचा प्रयत्न असूउद्दीन ओवेसी यांनी घेतला तर त्यांच्यात आणि अमित शहा यांच्यात खडाजंगी झाली.

सत्यपाल सिंह सांगत आहेत. त्या विधानाला त्यांच्याजवळ काय पुरावा आहे असे ओवेसी म्हणाले. तेव्हा अमित शहा उठून उभा राहिले आणि त्यांनी ओवेसी साहब तुम्हाला ऐकावे लागेल असे सुनावले. यावर ओवेसी म्हणाले गृहमंत्री तुम्ही मला धमकी देत आहेत काय? त्यावर अमित शहा म्हणाले तुम्हाला माझं बोलणं धमकी वाटत असेल तर मी काय करू शकतो. अशा खडाजंगी नंतर ओवेसी यांनी संसदेतून बाहेर पडताच माध्यमात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment