देशातील अर्धे जिल्हे कोरोनाग्रस्त, ‘ही’ १० ठिकाणे बनलेत कोरोना हॉटस्पॉट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ६ एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पसरला आहे. बहुतेक प्रकरणे हि मुंबई आणि नवी दिल्लीसह देशातील सर्वाधिक प्रभावित १० जिल्ह्यांमधील आहेत.इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिट (डीआययू) ला आढळले की ६ एप्रिल पर्यंत देशातील एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी कोरोना विषाणू ३३० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. भारतात कोविड -१९च्या संसर्गाची पुष्टी झालेल्या … Read more

महिलांचा सन्मान करा; अरविंद केजरीवाल यांनी शाळकरी मुलांना दिली शपथ

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली सरकार, सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रसारित केलेल्या संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांनी लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात स्वत: आणि त्यांच्या स्वतःच्या कुटूंबाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. अधिवेशनात शक्तीनगर येथील शासकीय शाळेत व तेथून इतर शाळांमध्ये थेट प्रक्षेपण केले गेले. केजरीवाल यांनी सर्व मुलांना उभे राहून पुढील शपथ घेतली: … Read more

उदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत नाहीच

नवी दिल्ली | आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकी सोबत लागावी असे त्यांना वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मात्र लागली नाही. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. … Read more

आज होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे . त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या दौ-यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानेही सर्व … Read more

पेट्रोल डीझेल दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली | सौदी आरमॅको कंपनीच्या विहीरींवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कंपनीने उत्पादन निम्मे केले आहे. त्याचे परिणाम भारतावर सुरू झाले आहेत. पेट्रोल-डिझेच्या दरात वाढ सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे पडसाद भारतात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात सलग दोन दिवसात प्रतिलिटर साधार २५ ते ३० पैसे वाढ झाली … Read more

कॉंग्रेस हाय कमांड : जेष्ठ नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढा ; या नेत्यांना लढण्याचे आदेश

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीला नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच जेष्ठ नेत्यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नेते निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढेल आसा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा अंदाज आहे. उद्या बुधवारी काँग्रेस छाननी समितीची नवी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. … Read more

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिंग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनीच स्वतः ट्विटर वरून घोषणा केली आहे. उद्या १४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. मात्र भाजप प्रवेशासाठी उदयनराजेंनी ठेवलेल्या दोन अटी मान्य झाल्यावरच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचे जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या सोबत आपल्या … Read more

अमित शहा यांच्यावर झाली ‘ही’ शस्त्रक्रिया

अहमदाबाद | अहमदाबादमधील वैष्णवी देवी सर्कलजवळील के.डी. रुग्णालयात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहा यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आली असल्याचे परिपत्रक रुग्णालयाने जरी केले आहे. मागील काही दिवसांपासून शाह याना मानेत त्रास जाणवत होता . ‘आज सकाळी नऊच्या सुमारास शहांवर ‘लिपोमा’ची  शस्त्रक्रिया करण्यात आली. … Read more

शोकाकुल वातावरणात अरुण जेटली यांना दिला अंतिम निरोप ; बोधी घाट येथे झाले अंत्यसंस्कार

नवी दिल्ली |  भाजप नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल शनिवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. विविध आजारांनी ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर निगम बोधी घाट येथे अंत्यसंस्कार करून अंतिम … Read more

म्हणून २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अरुण जेटली झाले होते अर्थमंत्री

नवी दिल्ली |  भाजप पक्ष असा पक्ष आहे की त्या पक्षाकडे अर्थमंत्री पदावर भासवण्यासाठी हुशार चेहऱ्यांची नेहमी कमी असते. त्यामुळे अरुण जेटली यांची लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अर्थमंत्री पदी वर्णी लागली होती. त्याचे झालेले असे की नरेंद्र मोदी यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पदावर बसवायचे होते. मात्र त्यांना अरुण जेटली यांना पर्याय दिसत नव्हता. … Read more