अरेच्या!!!! दुबई विमानतळावर चक्क ‘श्वान’ करतात करोना चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यंतरीच्या लॉकडाउन नंतर करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर जगभरातील काही देशांमध्ये विमान वाहतूक सुरू झाली आहे. विमान प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वच प्रवाशांची करोना चाचणी पार पाडली जात आहे आणि चाचणीचा निकाल अवघ्या काही मिनिटात येत आहे. या ठिकाणी खास श्वानांच्या मदतीने करोना चाचणी केली जात आहे.

करोनाबाधितांची ओळख पटवण्यासाठी श्वानांची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी काही श्वानांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे वृत्त होते. दुबई विमानतळावर या श्वानांकडून करोनाबाधित प्रवाशांचा शोध घेतला आहे. श्वानांमध्ये माणसांच्या तुलनेत स्मेल रिसेप्टर्स (वास घेण्याची क्षमता) ही १० हजार पटीने अधिक असते. त्यामुळे त्यांच्या मदतीने मलेरिया, कॅन्सर अथवा वायरल आजारबाधित व्यक्तींची ओळख पटवू शकतात.

करोना चाचणीसाठी स्वॅब घेतला जातो. काही चाचणी किट्समुळे अर्धा ते एक तासाच्या आत चाचणीचा निकाल समजतो. मात्र, श्वानांच्या मदतीने काही मिनिटांमध्ये करोनाबाधित प्रवाशी ओळखता येत असल्याचे विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले