श्रीनगर | २६ जुलै १९९९ रोजी करगिलच्या डोंगरावर तिरंगा फडकवण्यात आला आणि भारत कारगिल युद्धात विजयी झाला. कारगिल हा भारताचा १९४७ च्या भारत पाक युद्धा पासूनचा सीमावर्ती भाग आहे. या सीमेवर उंच उंच डोंगर असल्याने असुरक्षित सीमा म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. याच भागात पाकिस्तानी गुसखोरांनी हैदोस मांडला होता. गुसखोरांच्या पाठोपाठ पाकिस्तानी सैन्य या भागात शिरले आणि युद्धाला तोंड फुटले भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय नावाने सैनिकी कारवाही सुरू केली आणि २६ जुलै १९९९ रोजी विजय संपादित केला. कारगिलचे युद्ध जिंकण्यासाठी भारताच्या ५३० जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले तर १३६४ जवान जखमी झाले. पाकिस्तानची तुफान वाताहत होऊन दारुण पराभव झाला. कारगिल युद्धात पाकिस्तानचे तब्बल ३ हजार सैनिक ठार झाले होते.परंतु पाकिस्तानने या सत्यावर बोलायला कायम टाळले आणि हा मृत सैनिकांचा आकडा नेहमी नाकारला.
ऑपरेशन विजय राबवून भारताने विजय संपादित केला. तेव्हा पासून हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज सकाळीच कारगिल मधील विजयी स्मारकावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांनीही लष्कराच्या जवानांना विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.