दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले होते. इथले कामकाज पाहण्याकरता सर्वांसाठी खुले आहे असे त्यांनी म्हणले होते. आता त्या निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने कामकाजाचे थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायिक सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे असे यांसंबधी बोलताना न्यायालयाने म्हणले आहे. केंद्र सरकारने सहमती देऊन नवीन नियमावली बनवावी असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
थेट प्रक्षेपण झल्यास सरन्यायाधीशांच्या कोर्टरूमचे प्रक्षेपण केले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.