कर्जाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले,”व्याजदरावर व्याज घेऊन प्रामाणिक कर्ज घेणाऱ्यांना शिक्षा देता येणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या साथीच्या काळात लोन मोरेटोरियम संपुष्टात आणण्याच्या आणि व्याजदराच्या माफीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की, लोन रिस्ट्रक्चरिंगसाठी बँका स्वतंत्र आहेत, परंतु कोविड -१९ साथीच्या स्थगिती (मोरेटोरिअम) योजनेंतर्गत ईएमआय पेमेंट्स व्याजमुक्त करून ते प्रामाणिक कर्जदारांना शिक्षा देऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती अशोक भूषण … Read more

कर्जाच्या व्याजावर घेतल्या जाणाऱ्या व्याजमुक्तीबाबतच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जाच्या स्थगितीच्या (Loan Moratorium) कालावधीत सर्वोच्च न्यायालय कर्जावरील व्याज दर माफीवर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करेल. सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिले होते की, ते व्याज माफीच्या मुद्यावर विचार करीत नाहीत, परंतु व्याजावर लावलेल्या व्याजातून होणारी संभाव्य सूट कशी देता येईल याचा ते शोध घेत आहेत. ईएमआयमध्ये द्यावयाचे व्याजदेखील आकारले जाईल की नाही … Read more

लोन मोरेटोरियम बद्दल सरकारने SCला सांगितले की – कर्जाचा EMI न भरण्याची सवलत दोन वर्षांसाठी वाढ होऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे कर्जाच्या ईएमआयची परतफेड करण्यास सक्षम नसलेल्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर, केंद्र सरकारने (भारत सरकार) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कर्जावरील स्थगितीची मुदत दोन वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. पण यावर निर्णय आरबीआय आणि बँक घेतील. कोरोना विषाणूचा विचार लक्षात घेता लॉकडाउननंतर रिझर्व्ह … Read more

NEET आणि JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी ‘या’ ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी NEET UG 2020 आणि JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. JEE (main) परीक्षा … Read more

केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर ठाकरे सरकारने एकतर्फी निर्णय घेतले- देवेंद्र फडणवीस

पुणे । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर राज्य सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होतं अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते. यावेळी बोलताना … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, आता परिक्षेच्या तयारीला लागू- उदय सामंत

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीमुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिकिया दिली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे, हे राज्य सरकारचे धोरण होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला … Read more

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा निकाल

नवी दिल्ली । युजीसी विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज आज निकाल देणार आहे. सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येतील की कोरोना संकटाचा काळ लक्षात घेता पुढे ढकलण्यात येईल याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी संपल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या … Read more

IRDAI ने स्पष्ट केले की, ‘Motor Insurance रिन्यू करण्यासाठी पीयूसी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता यापुढे पीयूसी (Pollution Under Control) सर्टिफिकेट नसेल तर मोटर इंश्योरेंस (Motor Insurance) नाकारला जाणार नाही. विमा नियामक इर्डा (IRDAI) ने नमूद केले आहे की विमा कंपन्या वाहनचे पीयूसी (Pollution Under Control) सर्टिफिकेट नसल्याच्या कारणास्तव मोटार क्लेम नाकारू शकत नाहीत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जुलै 2018 मध्ये IRDAI ने विमा … Read more

‘हे’ कारण देत सुप्रीम कोर्टाने मोहरम मिरवणुकींना परवानगी देण्याची याचिका फेटाळली

नवी दिल्ली । मोहरम मिरवणुकींना परवानगी देण्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधन आली असून, मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असं कारण देत मोहरम मिरवणुकींना परवानगी नाकारली आहे. मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका … Read more