मुंबई | स्वप्निल हिंगे
आदिवासी भागातील कुपोषणाची आणि बालमृत्यूची समस्या लक्षात घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकासाचा प्रकल्प हाती घेतला. या जिल्ह्यातील आदिवासींना त्यांच्या कुटुंबानुसार ३२ किलो अधिक धान्य देन्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कुपोषण रोखण्यासाठी १५०० रुपये निर्वाह निधी व ६० वर्षाखालील आदिवासींना दरमहा काही रक्कम देण्याचा विचारही मुख्यमंत्री यांच्या विचाराधिन आहे.